इस्लामाबाद- पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाचे समर्थन करणार्या मलाला युसूफ झाईवर हल्ला करणार्यांना अटक करण्यात आली आहे. मलालावर 2012 मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता.
पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या 'शूरा' या संघटनेच्या 10 दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. पोलिस आणि गुप्तचर संघटांनी संयुक्तरित्या ही कारवाई केल्याचे पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते जनरल असीम बजवा यांनी सांगितले.
मलाला हिच्यावर 9 ऑक्टोबर 2012 रोजी दहशवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता, यामध्ये मलालाच्या डोक्यात गोळी लागली होती. मलालावर आधी पाकिस्तानात तर नंतर ब्रिटनमधील रूग्णालयात उपचार झाले. मलाला आता पूर्णपणे बरी झाली असून ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे.
(फाईल फोटो: मलाला युसूफ झाई)