आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलाला लिहिणार आत्मचरित्र ; कोट्यवधींचा करार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मुलींच्या शिक्षणाचे जाहीर समर्थन करणा-या मलाला युसूफजाईने ब्रिटनमधील एका प्रकाशन संस्थेशी करार केला आहे. आत्मचरित्र प्रकाशित करण्यास परवानगी देण्यासाठी झालेल्या कराराची रक्कम सुमारे 16 कोटी 29 लाख रुपये आहे. 15 वर्षीय मलालाच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन याचवर्षी होण्याची शक्यता आहे. ‘आय अ‍ॅम मलाला’ असे पुस्तकाचे नाव असेल.

विडेनफेल्ड अँड निकॉसन या प्रकाशन संस्थेकडून त्याचे प्रकाशन होणार आहे. मलाला आणि प्रकाशन संस्था यांच्यातील कराराच्या आकड्याला मात्र प्रकाशन संस्थेकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. मला माझ्या आयुष्यातील कहाणी सांगण्याची इच्छा आहे. ही कहाणी देशातील सुमारे 6 कोटी शालेय मुलांची आहे. ही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. सर्वांप्रमाणेच मुलींनाही शिक्षण मिळावे, हे माझे अभियान आहे. लहान मुलांना शिक्षण घेणे किती कठीण असते, याची जाणीव लोकांना होईल, अशी प्रतिक्रिया मलालाने दिली आहे. 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.