आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलाला युसूफजईसारख्या या चार तरुणीही बनल्या आहेत कमी वयात \'रोल मॉडेल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातील खैबर- पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील मिंगोरा शहरातील ती रहिवासी आहे. पाकिस्तानच्या मागास भागांत मुलींच्या शिक्षणाचे व्रत स्विकारल्यामुळे तालिबानींच्या हल्ल्याला मलाला हिला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही मलालाने मुलींना शिक्षित करण्याचे महान कार्य सुरुच ठेवले. मलालाचा महान कार्याचा गौरव करत तिला यंदाचा शांततेसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
मलाला हिने वयाच्या 11 वर्षी डायरी लेखणातून तालिबानींना विरोध दर्शवला होता. तालिबानकडून होणारी हिंसा आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणावर घातलेली बंदी, हे मलालास मुळीच पसंत नव्हते. 15 जानेवारी 2009 पासून एकही मुलगा शाळेत जाणार नाही, असा फर्माण तालिबानींनी काढला होता. मात्र, मलाला हिने तालिबानींचा फर्मान झुगारून लावला.
मलाला ही ऑक्टोबर, 2012 मध्ये शाळेतून घरी येत असताना तिच्यावर कट्टरवाद्यांनी हल्ला चढवला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. अखेर सत्याचा विजय झाला. मृत्यूच्या दाढेतून मलाला सुखरुप परतली. एखादा तरुण असो अथवा तरुणी त्याच्या हक्कांसाठी लढून परिवर्तन घडवून आणू शकतो, हा आदर्श मलाला हिने जगासमोर ठेवला आहे.
पाकिस्तान सरकारने मलालास राष्ट्रीय युवा शांती पुरस्काराने सन्मानित केले. तसेच आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार, ह्यूमन राइट अवॉर्ड यासह मलालास अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एवढेच नाही तर 10 नोव्हेंबर हा दिवस 'मलाला डे' म्हणून साजरा करण्‍यात यावा, अशी घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, मलालासारख्या धैर्यवान तरुणींविषयी, कमी वयात त्यांनी कतृत्त्वाच्या बळावर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे....