आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमधील रुग्णालयातून मलालास डिस्चार्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - शिक्षणाच्या प्रचारामुळे तालिबानी दहशतवाद्यांची लक्ष्य झालेल्या मलाला युसूफजाईची चार महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णालयातून सुटका झाली आहे. शुक्रवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला.

मलालावर नुकतीच पाच तासांची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे दिसून आले. क्विन एलिझाबेथ रुग्णालयात तिच्या कवटी आणि कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिचे प्रकृतीचे मूल्यमापन केल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षीय मलाला सध्या बर्मिंगहममधील आपल्या तात्पुरत्या घरात रहाणार आहे. स्वात खो-यात गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी तिच्यावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात तिला गोळी लागली होती. त्यानंतर तिला 15 ऑक्टोबरला एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.