आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malala Yousafzai, Misbah ul Haq Received Pakistan Civil Awards

मलाला, मिसबाहचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - अल्पवयीन सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझाई आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कप्तान मिसबाह-उल-हक यांच्यासह 103 जणांना पाकिस्तानच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी गेल्यावर्षी 14 ऑगस्ट रोजी 105 जणांच्या पुरस्कारासाठी स्वीकृती दिली. अन्य दहा जणांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

पुरस्कारामध्ये पाच परदेशी नागरिकांसह 39 वैयक्तिक नागरिकांचा समावेश आहे. मलाला युसूफझाई आणि दिवंगत पाकिस्तानी विद्यार्थी ऐतिझाझ हसन यांना सितारा-ए- शुजा पुरस्कार जाहीर झाला आहे. तालिबानने 2012 मध्ये मलालावर गोळीबार केल्यानंतर तिच्यावर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आले.