आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांकडून मलेशियन विमानाचा ब्लॅक बॉक्स परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनेस्क - मलेशियन विमानावर क्षेपणास्त्र हल्ला करून अपघाताचे ठिकाण ताब्यात घेतलेल्या युक्रेन बंडखोरांनी मंगळवारी संघर्षविरामाची भूमिका स्वीकारली. बंडखोरांनी या जागेवरील ताबा सोडत विमानाचा ब्लॅकबॉक्सही तपास अधिकार्‍यांच्या हाती सोपवला.

हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 280 प्रवाशांचे मृतदेह युक्रेन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या खारकीव शहरात एका ट्रेनमध्ये पाठवण्यात आले. हे सर्व मृतदेह नेदरलँडला पाठवण्यात येणार आहेत. कारण मृतांमध्ये बहुतांश 193 प्रवासी नेदरलँडचे होते.

डोनेस्क या स्वयंनियंत्रित भागातील पीपल्स रिपब्लिकचे नेते अलेक्झांडर बोरोडई यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि अन्य डाटा मलेशियन अधिकार्‍यांच्या हाती पत्रकारांसमोर सोपवला. मृतदेहाची तपासणी करण्यासाठी बंडखोरांनी शीत वातावरणात सर्व मृतदेह काल डच फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे सोपवले.