आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airline Flight 370 Hijacked For 9 11 Type Attack In India

मलेशियाच्या बेपत्ता विमानाने भारतावर होणार 9/11 सारखा दहशतवादी हल्ला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर/ बिजींग - मलेशियाचे बेपत्ता MH370 विमानाचा गेल्या आठवड्यापासून शोध सुरू आहे. त्या विमानाचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अमेरिकेचे माजी राजनैतिक अधिकारी स्ट्रोब टेल्बोट यांनी वेगळीच शक्यता व्यक्त केली आहे. त्यांचा अंदाज आहे, की बेपत्ता MH370 ने भारतातील एखाद्या शहरावर हल्ला होऊ शकतो. त्यांनी विमानातील इंधन, दिशा आणि अंतर या आधारावर भारतावर 9/11 सारखा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
स्ट्रोब टेल्बोट हे ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूट आणि येल विद्यापीठाचे परराष्ट धोरणाचे विश्लेषक आहेत. तसेच, बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात ते अमेरिकेचे उप पराष्ट्र मंत्री होती. स्ट्रोब यांनी व्यक्त केलेल्या शक्यते नंतर भारतीय गुप्तचर संस्था आणि सुरक्ष यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, भारताने यावर अद्याप प्रतिक्रीया दिलेली नाही.
याआधी, बेपत्ता मलेशियन विमानाचा चीन किंवा हिंदी महासागरात कुठेच शोध लागू शकलेला नाही. विमानाचे नेमके झाले काय, हा प्रश्न अजूनही शिल्लक असताना शनिवारी मलेशियाचे पंतप्रधान नाजीब रझाक यांनी पत्रकार परिषद घेऊन या विमानाचे अपहरण झाले असल्याचा दावा केला. जाणीवपूर्वक कोणीतरी विमानावर नियंत्रण मिळवले असल्याचे रझाक यांचे म्हणणे आहे. कझाकिस्तान व तुर्कमेनिस्तानच्या उत्तरेकडील समुद्रात या विमानाचा अजूनही शोध सुरू असून हिंदी महासागरातील दक्षिण प्रदेशात काही अवशेष सापडतात का, याचा शोध घेतला जात आहे.
मलेशियाच्या पूर्वेकडील किनारपट्टी प्रदेशात दाखल होताच विमान उपग्रहाच्या कक्षेबाहेर गेले. याच बिंदूवरून विमान इतरत्र वळवण्यात आले असावे, असाही एक अंदाज आहे. विमानाशी 8 मार्च रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता, अशी माहिती रडारवर उपलब्ध आहे.