आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines Accident News In Marathi, China

मलक्काच्या खाडीत मलेशियाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- मलक्काच्या खाडीत मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे अवशेष सापडले आहेत, असे मलेशियाच्या लष्कराने सांगितले आहे. रडारच्या माध्यमातून विमानाचे अवशेष शोधण्यात आले. यापूर्वी ज्या ठिकाणी विमान कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापासून बऱ्याच दूर अंतरावर अवशेष सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यासंदर्भात मलेशियाच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे, की कोटा भारू येथून विमानाने आपला मार्ग बदलला होता. त्यानंतर विमान बऱ्याच कमी उंचीवरून उड्डाण करीत होते. त्यानंतर विमान मलक्काच्या खाडीत कोसळले असावे.
मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे कोणतेही अवशेष गेल्या काही दिवसांमध्ये न सापडल्याने मोठी शोध मोहिम उघडण्यात आली होती. दहा देशांच्या विमानवाहू नौका, लढाऊ विमाने, अत्याधुनिक शोध सुविधा असलेली जहाजे गेल्या अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर आहेत. गेल्या शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बिजिंगला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केले होते.
आग्नेय आशियाच्या हवाई क्षेत्रातून अचानक विमान गायब झाले होते. यात एकूण 239 प्रवासी होते. विमानासंदर्भात अद्याप ठोस माहिती न मिळाल्याने प्रवाशांचे नातलग अजूनही विमानतळाच्या आवारात बसून आहेत.
विमानाचे अवशेष शोधण्यासाठी चीनने तैनात केले दहा सॅटेलाईट
दुर्घटनाग्रस्त विमानाच्या शोध मोहिमेला गती देण्यासाठी चीनने दहा सॅटेलाईट दक्षिण चीनजवळच्या अंतराळात तैनात केले आहेत. पिपल्स लिबरेशन आर्मीने दिलेल्या माहितीनुसार, दहा सॅटेलाईट शिआन सॅटेलाईट मॅनिटर अॅण्ड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात आले आहेत. विमानाचे इतर अवशेष शोधण्यासाठी हायरिझोल्युशन फोटोंचा अभ्यास करण्यात येत आहे.
विमानाच्या मार्गासंदर्भात अद्यापही ठोस माहिती नाही...वाचा पुढील स्लाईडवर