आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines Accident News In Marathi, China

मलेशियाचे बेपत्ता विमान अंदमानजवळ कोसळल्याचा अंदाज, भारताने उघडली शोध मोहिम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले मलेशियन एअरलाइन्सचे फ्लाइट एमएच 370 अंदमान आणि निकोबार या भारतीय बेटांजवळ कोसळले असावे, असा अंदाज मलेशियाच्या लष्कराने व्यक्त केला आहे. मलक्काच्या खाडीत विमानाचे अवशेष पडले असल्याचा दावा काल (मंगळवार) या लष्कराकडून करण्यात आला होता. परंतु, अखेर तेथे अवशेष सापडले नाहीत.
मलेशियाच्या लष्कराने गेल्या पाच दिवसांमध्ये बेपत्ता विमानाविषयी बरीच अविश्वसनिय माहिती दिली आहे. क्वालालंपूर येथून बीजिंगला जात असताना आग्नेय आशियातून हे विमान अचानक गायब झाले होते. येथूनच नियंत्रण कक्षाशी असलेला विमानाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे प्रारंभी याच ठिकाणी समुद्रात शोध मोहिम राबविण्यात आली. परंतु, विमानाचे अवशेष मलक्काच्या खाडीत असल्याचा दावा काल मलेशियन लष्कराने केला. रडारच्या माध्यमातून अवशेष शोधून काढले असल्याचे लष्कराने सांगितले होते. परंतु, तेथे प्रत्यक्षात गेल्यावर अवशेष मिळाले नाहीत. आता लष्कराने सांगितले आहे, की अंदमान आणि निकोबार बेटांजवळ विमान कोसळले असावे.
दरम्यान, मलेशियाच्या लष्कराने जाहीर केलेल्या माहितीनंतर भारतीय नौदलाने अंदमान आणि निकोबार बेटांजवळ शोध मोहिम उघडली आहे. विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक युद्धनौकांचा वापर करण्यात येत आहे.