आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines Accident News In Marathi, China

गूढ कायम: अंदमान-निकोबार परिसरातही विमान शोधमोहीम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर- बेपत्ता मलेशियन विमानाची शोधमोहीम आता भारताकडे वळाली असून मलेशियन सरकारने याप्रकरणी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल मलेशियन सरकारला यासंबंधी पत्र लिहिले होते. शोधमोहिमेसाठी भारतातील तज्ज्ञ लोकांची टीमही सज्ज असल्याचा दिलासाही त्यांनी मलेशियन सरकारला दिला आहे.

239 प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाच्या शोधकार्यात 10 देशांची 34 विमाने, 40 जहाजे दिवस-रात्र विमानाचा शोध घेत आहेत, मात्र यासंबंधी अद्याप काहीही पुरावा हाती आलेला नाही. दक्षिण चीनच्या समुद्रातही विमानाचे काही अवशेष किंवा पुरावे सापडले नसल्याने शोधमोहीम आणखी व्यापक करत तिचा मोर्चा अंदमानच्या दिशेने वळवण्यात आला आहे. परिणामी मलेशियन सरकार या मोहिमेत भारताची मदत घेऊ शकते. अंदमान -निकोबार बेटांवर भारताचे तिन्ही दलाचे लष्कर तैनात असून त्यांची या परिसरात गस्त सुरू असते.

दरम्यान, विमानाचा संपर्क तुटण्यापूर्वी ते नियोजित मार्गापासून हजारो किलोमीटर दूर गेले असल्याचा संशय मलेशियन लष्कराकडून व्यक्त केला जात आहे. लष्करानेच अशा प्रकारे संशय व्यक्त केल्यामुळे ही घटना म्हणजे जगभरातील हवाई दलांसाठी एक रहस्य बनली आहे.

काय झाले असेल विमानाचे?
विमनाच्या शोधमोहिमेत अनेक तज्ज्ञ विविध प्रकारच्या शक्यता पडताळून पाहत आहेत. यात विस्फोट, इंजिन बिघाड, दहशतवादी हल्ला, तीव्र आपत्तीजनक स्थिती, वैमानिकाची चूक किंवा आत्महत्या यासारखे पर्यायही तपासून पाहिले जात आहेत. अमेरिकी गुप्तचर संस्था सीआअएने मात्र दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

शोधमोहिमेत सामान्यांचाही सहभाग : दरम्यान बेपत्ता मेलशियन विमानाचा शोध घेण्यासाठी मलेशियन एअरलाइन्सने डिजिटल ग्लोब या कंपनीच्या माध्यमातून एक व्यापक मोहीम हाती घेतली आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. टॉमनॉड डॉट कॉम या वेबसाइटवर विमानाच्या हवाई मार्गाचे हाय रिझोल्युशन फोटो टाकण्यात आले आहेत. उपग्रहावरुन काढलेले 6 लाख फोटो या वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत. या फोटोमध्ये कुठेही विमानाचे अवशेष, तेल गळती किंवा संशयास्पद गोष्ट आढळून आल्यास त्या ठिकाणी टॅग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. डिजिटल ग्लोब कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल एका दिवसातच 1 कोटी लोकांनी वेबपेजला भेट दिली.

भारताला मदतीचे आवाहन
मलेशियन विमानाचा शोध लागण्यासाठी आता ईश्वरालाच साकडे घातले जात आहे. प्रसिद्ध मलेशियन मांत्रिक इब्राहिम मत झिन दोन नारळ घेऊन प्रार्थना करताना.

संपर्क तुटण्यापूर्वी विमानाने मार्ग बदलला असेल तर...
०विमानाने संपर्क कक्षेतून दूर जात असल्याचा इशारा रडारवर का दिला नाही?
०विमानाचा मार्ग बदलताना क्रू मेंबर्स शांत का राहिले?
०विमान माघारी फिरले असेल तर विमानाने आपत्तीदर्शक सूचना का दिल्या नाहीत ?

अखेरचे शब्द : ऑल राइट..गुड नाइट
239 प्रवाशांच्या विमनाने शुक्रवारी रात्री 12.41 वाजता क्वालालंपूर येथून बीजिंगकडे उड्डाण केले. त्यानंतर विमानाशी अखेरचा संपर्क झाला तेव्हा ते 35,000 फूट उंचीवर मलेशिया ते व्हिएतनामदरम्यान होते. अखेरच्या संभाषणात विमानाकडून ‘ऑल राइट, गुड नाइट’ असा संदेश पाठवण्यात आला.

पंतप्रधानांचेही अवसान गळाले
बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी मलेशियन पंतप्रधान नजीब रझ्झाक यांची भूमिका मात्र काहीशी अवसान गळाल्यासारखी वाटत आहे. ‘विमानाच्या शोधमोहिमेत सरकारने सर्व शक्ती, सर्व दल पणाला लावले आहेत. बोइंग 777 या विमानाची आजवरची कामगिरी उत्तम होती. पण आजचे वास्तव आपण स्वीकारायला हवे. कारण ईश्वरापुढे आपण सर्वजण खुजे आणि कमकुवत आहोत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी काल दिली. दरम्यान, सरकारच्या या शोधमोहिमेला यश मिळावे यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.