आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines MH370: New Pings Detected In Search For Black Box News In Marathi

MH370 : महिनाभरानंतर विमानासंबंधी ब्लॅकबॉक्समधून पुन्हा संदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ - महिन्यापासून बेपत्ता मलेशियन विमानाच्या शोधमोहिमेत सहभागी ऑस्ट्रेलियन विमानाला दक्षिण हिंदी महासागरातून गुरुवारी पुन्हा नवीन संकेत मिळाले आहेत. गेल्या आठवडाभरात पाण्यातून मिळालेल्या अशा संकेतांमुळे मलेशियन विमान सापडण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

मागील वेळी ज्या ठिकाणाहून ध्वनी संकेत मिळाले, त्याच ठिकाणाहून पाचवा संकेत मिळाला आहे. हे संकेत बेपत्ता मलेशियन विमान एमएच 370 च्या ब्लॅक बॉक्सद्वारेच देण्यात आलेले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या ध्वनी रूपातील संकेतांचे विश्लेषण करण्यासाठी काही तास लागतील, मात्र एखाद्या मानव निर्मित स्रोताकडूनच हे संकेत पाठवलेले असावेत, अशी माहिती शोधमोहिमेचे संयुक्त समन्वयक अँगस ह्युस्टन यांनी दिली आहे. तत्पूर्वी बुधवारी त्यांनी यासंबंधी माहिती दिली होती.