आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines Plane Carrying 239 People Crashed

क्वालालंपूर-बिजींग विमान कोसळले, 5 भारतीयांसह 239 जणांचा दुर्दैवी अंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालंलपूर - मलेशिया एअरलाइन्सचे एक प्रवाशी विमान दक्षिण चीनच्या समुद्रात कोसळले आहे. मलेशियाची राजधानी क्वालंलपूर येथून चीनची राजधानी बिजींगसाठी MH370 या विमानाने उड्डाण केले होते. यात चालक दलासह 239 प्रवाशी होते. या प्रवाशांमध्ये एका महिलेसह पाच भारतीयांचाही समावेश होता. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दिल्ली येथून काठमांडूला जाणाऱ्या इंडिगो विमानाला काठमांडू विमानतळावर उतरताना भीषण आग लागली. विमानातील प्रवाशांना तातडीने विमानाबाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही.
काठमांडूच्या त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्सचे विमान दिल्ली येथून काठमांडूला जात होते. काठमांडूला आल्यावर धावपट्टीवर उतरताना विमानाला भीषण आग लागली. त्यामुळे प्रवाशांना इमरजन्सी दारातून विमानाबाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले असून अपघातामागच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
व्हिएतनाम येथून मिळालेल्या माहितीनुसार, का माऊच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर एका मिनीटांत क्वालंलपूर येथून बिजींगला जाणाऱ्या विमानाचा एअर ट्रॅफिकसोबतचा संपर्क तुटला.
व्हिएतनामच्या नौदलाने केली पुष्टी
व्हिएनामच्या वरिष्ठ नौदल अधिका-याने विमान समुद्रात कोसळल्याच्या वृत्ताल दुजोरा दिला आहे. टुओ ट्रे वृत्तपत्राने नौदलाचे पॉलिटीकल कमिश्नर अॅडमीरल गो वेन फेट यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की विमान थो छू बेटापासून 300 किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळले आहे. मात्र, मलेशिया एअरलाइन्सने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
फेट म्हणाले, व्हिएतनाम सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांकडून आदेश आल्यानंतर बचाव कार्याला सुरवात केली जाईल.
विमानत एकूण 239 लोक
विमानात 227 प्रवाशी आणि चालक दलाचे 12 सदस्य होते. विमानातील प्रवाशी हे विविध 14 देशांचे नागरिक होते. त्यातील 160 प्रवाशी हे चीनचे आहेत. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

मलेशिया एअरलाइन्सने प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी आपातकालिन क्रमांक सुरु केला आहे. +603 7884 1234 या क्रमांकवर प्रवाशांचे नातेवाइक संपर्क करु शकतात.

पुढील स्लाइडमध्ये, कोणत्या देशाचे किती प्रवाशी