आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Airlines Plane Mh17 Was Shot Down By Missile Strike

मलेशियन विमानाला क्षेपणास्त्रानेच उडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किव्ह/ दोनेत्स्क - मलेशियन एमएच 17 हे प्रवासी विमान क्षेपणास्त्रानेच उडवल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमध्ये मलेशियन विमान एमएच 17 च्या ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. तपासकर्त्यांनी याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे. मात्र, क्षेपणास्त्राचा घातक अणकुचीदार भागाला धडकून विमानात स्फोट झाल्याचे संकेत युक्रेनच्या तज्ज्ञांनी दिले आहेत. ब्लॅक बॉक्स फ्लाइट रेकॉर्डरमधून हे उघड झाले आहे. हे विमान युक्रेनच्या रशियासमर्थक बंडखोरांनी उडवल्याचा संशय आहे.

दरम्यान, पूर्व युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. युक्रेन लष्कर आणि रशिया समर्थक बंडखोरांमध्ये झालेल्या तुंबळ युद्धात किमान 70 जण ठार झाले. यामध्ये पाच मुलांसह 20 नागरिक, 30 बंडखोर आणि 23 युक्रेनियन सैनिकांचा समावेश आहे.

युक्रेन जवानांनी बंडखोरांचा गड दोनेत्स्क व लोहांस्कनजीक पोहोचल्याचा दावा केला आहे. त्यांनी बंडखोरांच्या तावडीतून दोन गावे मुक्त केल्याचे सांगितले. ही गावे स्नेझनोएजवळ आहेत. मलेशियाचे विमान एमएच 17 याच ठिकाणी पाडण्यात आले होते. युक्रेन लष्कराचे जवान विमान दुर्घटनास्थळाकडे कूच करत असल्याचे सांगण्यात येते.