आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलेशियात बोट बुडून 36 जणांना जलसमाधी; ईदसाठी घरी परतत होते मजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालम्पूर- मलेशियाच्या किनारपट्टीजवळ मजुरांना घेऊन येणार्‍या बोटीला शनिवारी जलसमाधी मिळाली. त्यात किमान 36 जण मृत झाल्याचे सांगण्यात आले. हे बेकायदा स्थलांतरित असून ईद साजरी करण्यासाठी ते घरी परतताना ही घटना घडली.

इंडोनेशियातून गुरुवारी निघालेली ही बोट मध्यरात्री बुडाली. अजस्र लाटांचा मारा सहन न झाल्याने ही बोट बुडाली. मलेशियाच्या दक्षिण भागातील सागरी क्षेत्रात ही घटना घडली. मलेशियाच्या तटरक्षक दलाने वेगाने मदतकार्य केले. त्यामुळे किमान चार जणांना वाचवण्यात यश मिळाले. मलेशियाची गस्त घालणारे जहाज या भागातून जात असल्यामुळे चार जणांचे प्राण वाचू शकले. बोटीतून 40 बेकायदा स्थलांतरित नागरिकांना आणले जात होते. मलेशियातील गरीब लोक शेजारील इंडोनेशिया, म्यानमारमध्ये रोजगारासाठी बेकायदा पद्धतीने जातात. त्यातून अनेक प्रकारच्या दुर्घटना घडू लागल्या आहेत.