आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Flight MH370: China Planes Boost Indian Ocean Hunt

बेपत्ता विमानाला हिंदी महासागरात जलसमाधी, सर्व प्रवाशांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर/पर्थ - गेल्या 8 मार्चपासून बेपत्ता मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचा प्रवास दक्षिण हिंदी महासागरात कोसळल्यानंतरच थांबला. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सोमवारी रात्री ही घोषणा केली. विमानातील सर्व 239 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून जगातील 26 देशांनी सुरू केलेले शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

विमानाचे कथित अवशेष अनेक देशांच्या पथकांनी पाहिल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात हे अवशेष बेपत्ता विमानाचेच आहेत, या निष्कर्षावर कोणीही पोहोचू शकले नव्हते. चिनी विमानांना पर्थपासून अडीच हजार किमी अंतरावर हिंदी महासागरात काही अवशेष दिसले होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबट यांनी सोमवारी आपल्या देशाच्या विमानांनी रंगीत वस्तू समुद्रात पाहिल्याचे सांगितले. काही वेळात ही विमाने त्या वस्तूंपर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

बीडच्या क्रांती शिरसाटसह पाच भारतीय : या दुर्दैवी विमानात बीड येथील क्रांती शिरसाट यांच्यासह पाच भारतीय प्रवासी होते. मात्र, विमान कोसळल्याबाबत रात्री उशिरापर्यंत बीड येथे अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.

अवशेष काढणार कसे?
ज्या भागात विमान कोसळले तेथे हिंदी महासागराची खोली 3770 ते 23 हजार फूट आहे. हे विमान समुद्रतळाशी गेले असेल तर ते बाहेर काढणे केवळ अशक्य आहे.