आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Missing Plane MH370 After China Australia Navy Ship Detects Pings

बेपत्ता \'MH370\'च्या \'ब्लॅक बॉक्स\'चे संकेत मिळाल्याचा ऑस्ट्रेलियाचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- बेपत्ता मलेशियन विमान 'MH370'बाबत आगामी काही तासांत सकारात्मक घोषणेची अपेक्षा आहे. मलेशियाचे सरंक्षणमंत्री हिशामुद्दीन मुसेन यांनी सांगितले, की दक्षिण हिंदी महासागरातून सलग संकेत मिळत आहे. हे संकेत विमानाच्या ब्लॅक बॉक्सकडून मिळणार्‍या संकेताशी मिळतेजुळते आहेत.

एका 'पिंगर लोकेटर'ने हिंदी महासागरातून काही संकेत प्राप्त केले आहेत. विमानाच्या ब्लॅक बॉक्सकडून मिळणार्‍या संकेताशी ते मिळतेजुळते असल्याचा दावा चीननंतर आता ऑस्ट्रेलियाने केला आहे. गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेले मलेशियन एअरलाइन्सचे विमान 'MH370'च्या 'ब्लॅक बॉक्स'चे असू शकतात, अशी माहिती या शोधकार्याचे नेतृत्त्व करणारी संयुक्त एजेंसी समन्वय केंद्राचे (जेएसीसी) प्रमुख एअरचीफ मार्शल (निवृत्त) अँगस ह्युस्टन यांनी‍ आज (सोमवार) दिली आहे. त्यामुळे मलेशियन विमानाबाबतची आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाली आहे.

अँगस ह्युस्टन म्हणाले, बोइंग विमान एमएच 370चा शोध घेणार्‍या एका ऑस्ट्रेलियन जहाजाला हे संकेत हिंदी महासागरातून प्राप्त झाले आहेत. हे संकेत विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून मिळणार्‍या संकेंताशी मिळतेजुळते आहेत.

आस्ट्रेलियन 'ओशन शील्ड' या जहाजाला दोनदा संकेत मिळाले आहेत. एकदा तर दोन तासांहून अधिक काळ हे संकेत मिळत होते. संकेताचे स्त्रोत समुद्रात‍ साडे चार किलोमीटर अंतरावर आहे.

दरम्यान, च‍िनी जहाजांनी दिलेले दोन ऑडिओ संकेत ज्या ठिकाणाहून मिळाले आहेत. त्या ठिकाणी आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेले ब्रिटिश नौसेनाचे जहाज 'एचएमएस इको' पोहोचले आहे. विमानाचा शोध घेण्‍याचे काम सुरु असून लवकरच निष्कर्षापर्यंत पोहचू असेही ह्युस्टन यांनी सागितले आहे.