आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Missing Plane Mh370 Australia Searching Operation News In Marathi

MH370: हिंदी महासागरात आढळले 122 संभाव्य अवशेष; पुन्हा उघडली शोध मोहिम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर- हिंदी महासागरात जवळपास 122 संभाव्य अवशेष आढळून आल्याचे मलेशियन सरकारने आज (बुधवार) सांगितले. गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या 'MH370' विमानाशी संबंधित हे कथित अवशेष असू शकतात, असेही मलेशियाचे संरक्षणमंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितले. सॅटेलाइटच्या माध्यमातून हे अवशेष दिसले असून MH370 ची शोध मोहीम पुन्हा एकदा राबविण्यात येत आहे.

चीनने नियुक्त केला विशेष अधिकारी...
चीन सरकारने बेपत्ता असलेल्या MH370 या विमानाशी संबंधित सर्व माहिती घेण्यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त केला आहे. चीनचे उपपरराष्ट्र मंत्री झेंग येसूई यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येसूई कुआलालंपूर येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 'MH 370' मध्ये चीनमधील सर्वाधिक प्रवासी होते. बेपत्ता विमानाबाबत चीनने मलेशिया सरकारला पुरावे मागितले आहे.

प्रवाशांच्या नातेवाईकांचा मलेशियन सरकारवर आरोप..
चीन सरकारनुसार, MH 370 चे शोध कार्य केंद्र सरकारच्या अजेंड्यावर आहे. चीनचे दोन पथक आधीच कुआलालंपूरमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे, चिनी प्रवाशांच्या नातेवाईकांनी मलेशियन सरकारवर विमानासंदर्भात खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, ऑस्ट्रेलिया सरकारने पुन्हा उघडली शोध मोहीम...