आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Plane News In Marathi, Indian Officials, MH370

MH370: विस्फोट किंवा विमान कोसळल्याचा कोणताही पुरावा नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- मलेशियाच्या बेपत्ता विमानाशी जोडता येईल असा कोणताही विस्फोट किंवा क्रॅश पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळून आलेला नाही, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्हिएन्ना येथील कॉम्प्रिहेन्सीव्ह न्युक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी ऑर्गनायझेशनने दिली आहे.
यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मुन यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी सांगितले, की बेपत्ता विमानाशी जोडता येईल असा महासागरावर किंवा जमिनीवर अद्याप कोणताही विस्फोट किंवा क्रॅश व्हिएन्ना येथील ऑर्गनायझेशनला आढळून आलेला नाही. ऑर्गनायझेनच्या इंटरनॅशनल मॉनिटरिंग सिस्टिमकडून (आयएमएस) वापरण्यात येत असलेल्या चारपैकी तीन तंत्रज्ञानात अशा स्वरुपाचे क्रॅश दिसून येतात.
एखाद्या देशाकडून करण्यात येणाऱ्या अणूस्फोटाचे पुरावे गोळा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष स्फोटाची माहिती मिळविण्यासाठी आयएमएस तंत्रज्ञान वापरण्यात येते. या अंतर्गत सॅटेलाईटच्या माध्यमातून जमिनीवर आणि समुद्रावर पाळत ठेवली जाते. एखाद्या मोठ्या प्रवासी विमानाचा स्फोट झाला तर त्याचीही माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळविता येऊ शकते.
मलेशिया माहिती लपवित आहे, भारताचा आरोप
मलेशियाचे बेपत्ता विमान निकोबार द्विपावरील धावपट्टीवर उतरले असावे, अशी माहिती मलेशियाच्या प्रशासनाकडून दिली जात आहे. परंतु, ही संपूर्ण माहिती खोटी आहे. या द्विपाच्या जवळपासही विमान आले नव्हते आणि क्रॅशही झाले नाही. अत्याधुनिक रडार यंत्रणेमुळे भारतीय एरोस्पेसमध्ये आलेल्या कोणत्याही विमानाची माहिती मिळविता येऊ शकते, असे भारतीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विमानाची सविस्तर माहिती मलेशियाकडून दिली जात नसल्याचा आरोप भारताने केला आहे.
विमानाचा मार्ग बदलणारा कॉकपीटमध्ये होता, अमेरिकेचा दावा...वाचा पुढील स्लाईडवर