आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysia Releases Preliminary Report On Flight MH370

\'MH370\'बाबत मलेशियाचा REPORT, 17 मि‍निटातच \'रडार\'बाहेर होते विमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले विमान 'MH370'बाबत मलेशिया सरकारने प्राथमिक अहवाल पहिल्यांदा सार्वजनिक केला केला आहे. 'एअर ट्रॅफिक कंट्रोलर'ने दिलेल्या माहितीनुसार 'MH370' ने उड्डान घेतल्यानंतर अवघ्या 17 मिनिटातच ते रडार कक्षेबाहेर गेले होते. मलेशियन एअरलाइन्सचे जेट विमान रहस्यमयरित्या 'रडार'बाहेर गेल्याच्या तब्बल चार तासांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे.
मलेशिया सरकारने दोन तथ्थ्यांच्या आधारे गुरुवारी (1 मे) पाच पानी अहवाल घटना घडल्यानंतर दोन महिन्यांनी सादर केला आहे. प्रवाशांच्या नातेवाईकांनी सत्य माहितीसाठी मलेशिया सरकारकडे वारंवार मागणी केली होती. मात्र, अहवाल देण्यासाठी मलेशिया सरकार टाळाटाळ करत होते. मात्र अहवाल पाहिल्यानंतर बीजिंगमधील मलेशियन दूतावासबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांनी निदर्शने केली.

आठ मार्चला स्था‍निक वेळेनुसार, पहाटे 1 वाजून 21 मिनिटांनी मलेशियान विमान 'MH370'ने उडड्‍ान घेतली. विमानात पाच भारतीयांसह 239 प्रवाशी होते. मात्र, अवघ्या 17 मिनिटात अर्थात 1 वाजून 38 मिनिटांला रडारबाहेर गेले होते. MH370 विमान अखेर गेले तरी कुठे? असा सवाल व्हियतनाममधील होशी मिन्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलरने मलेशियाला केला होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे MH370 रडार क्षेत्राच्या बाहेर केल्यानंतर चार तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले नव्हते. विमान बेपत्ता झाल्याची संपूर्ण माहिती अधिकार्‍यांना असतानाही इतका इलगर्जीपणा कशासाठी करण्‍यात आला? असा सवाल आता प्रवाशांच्या नातेवाईवाईकांनी केला आहे. मलेशियाने जारी केलेल्या अहवालानुसार, सकाळी 5 वाजून 30 मिनिटाला मलेशियन अधिकार्‍यांनी बचाव कार्याला सुरुवात केली.