आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysian Investigators Conclude MH370 Flight Hijacked

बेपत्ता एमएच 370 विमानाच्या अपहरणाची शक्यता, मलेशियन पंतप्रधानांचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - आठवडाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. मलेशियन एअरलाइन्सचे एमएच 370 विमानाचे अपहरण केले असण्याची शक्यता आहे. मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 'विमानाच्या अपहरणाची शक्यता नाकारता येत नाही. विमानाला त्याच्या मार्गापासून दुसरीकडे घेऊन जाण्यात आले असले पाहिजे. विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवाशांबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरु असून, प्रत्येक शक्यता तपासून पाहिली जात आहे.'
याआधी मलेशियाच्या अधिकार्‍यांच्या शोध मोहिमेत विमानाच्या अपहणाची माहिती मिळाली होती. तपास अधिकार्‍यांनी म्हटले होते, की विमान चालवण्याची माहिती असलेल्या एक-दोघांनी विमानाचे अपहरण केले असण्याची शक्यता आहे. एका अधिकार्‍याने सांगितले, की अपहरणानंतर विमानाची संपूर्ण संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अज्ञातस्थळी नेण्यात आले असले पाहिजे.