सिडनी- मलेशियाच्या बेपत्ता विमानाचे हिंदी महासागरातील संभाव्य अवशेष शोधण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पाठविलेल्या चारपैकी पहिले लष्करी विमान परतले आहे. या विमानाला मलेशियाच्या विमानाचे संभाव्य अवशेष आढळून आलेले नाहीत. अवशेष समुद्रात बुडाले असावेत, असा अंदाज ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान वॅरेन ट्रस यांनी व्यक्त केला आहे.
16 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाच्या सॅटेलाईटने घेतलेल्या हिंदी महासागराच्या छायाचित्रांमध्ये दोन संभाव्य अवशेष आढळून आले होते. याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबॉट यांनी संसदेला दिली होती. त्यानंतर संबंधित अवशेष शोधण्यासाठी लष्कराची चार विमाने पाठविण्यात आली होती. परंतु, यापैकी पहिले विमान अपयशी परतले आहे.
यासंदर्भात माहिती देताना वॅरेन ट्रस यांनी सांगितले, की समुद्रावर तरंगताना दिसून आलेले ऑब्जेक्ट कदाचित समुद्राच्या पोटात गेले असावेत. कोणतीही वस्तू फार काळ समुद्रावर तरंगत राहू शकत नाही. तरीही सुमारे 2500 किलोमीटर महासागरावर शोध मोहिम राबविली जात आहे. इतर तीन लष्करी विमाने शोध घेत आहेत.
एका कार्गो जहाजाला पाठविले होते, संभाव्य अवशेष असलेल्या ठिकाणी, वाचा पुढील स्लाईडवर