आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaysian Plane News In Marathi, Malayasian Airlines, Minister, Australia

बेपत्ता विमानाचा पहिला विश्वासार्ह पुरावा सापडला, मलेशियन मंत्र्याचा दुजोरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियन सरकारने जारी केलेला नकाशा - Divya Marathi
मलेशियन सरकारने जारी केलेला नकाशा

सिडनी - मलेशियाच्या बेपत्ता विमानाच्या ठावठिकाणाबाबत पहिला विश्वासार्ह पुरावा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने पुरवलेला पुरावा विश्वासार्ह असल्याचे मलेशियाचे वाहतूकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, संबंधित ढिगा-याचा बेपत्ता विमानाशी काही संबंध आहे अथवा नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
विमानाच्या शोधकामात चीन 21 उपग्रहांची मदत घेत असल्याचे मलेशियाच्या मंत्र्यांनी सांगितले.
मलेशियाचे शेजारी देश कम्बोडिया, लाओस, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम शोध मोहिमेत संपूर्ण सहकार्य करत आहेत.


त्याआधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबट यांनी सापडलेल्या दोन वस्तू विमानाचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उपग्रह छायाचित्रांतून या वस्तूंची ओळख पटली. 8 मार्च रोजी क्वाललंपूरहून बीजिंगला जाणारे एमएच 370 विमान बेपत्ता झाले. यामध्ये 5 भारतीयांसह 239 प्रवासी होते. उड्डाणाच्या वेळीच विमानाचा संपर्क तुटला होता.


संभाव्य ढिगारा
ऑस्ट्रेलियाच्या सागरी सुरक्षा प्राधिकरणाचे प्रवक्ते जॉन यंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या सागरी किना-यापासून 2500 कि.मी.वर, दक्षिण हिंदी महासागरात दोन वस्तू दिसल्या आहेत, परंतु तिथे पोहोचणे कठीण असून बेपत्ता विमानाशी त्यांचा संबंध असेलच असे ठाम सांगता येणार नाही. ढिगारासदृश भागात ऑस्ट्रेलियाचे विमान टेहळणीसाठी रवाना झाले आहे. काही तासांतच आणखी काही विमाने पाठविण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाने जहाजांचा ताफाही पाठवला आहे. विमान शोध मोहिमेत 26 देशांचा सहभाग आहे.