आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीव निवडणुकीत नाशीद आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माले- 2008 मध्ये लोकशाहीची स्थापना झालेल्या मालदीवमध्ये शनिवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद नाशीद हे 46 टक्के मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 470 मतदान केंद्रातून 2 लाख 30 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात चार उमेदवार आहेत. मोहंमद वाहिद, माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद, देशावर 30 वर्षे सत्ता गाजवणारे मौमून अब्दुल गायूम यांचे बंधू अब्दुल्ला यामीन, आणि गासिम इब्राहिम या शर्यतीत आहेत. 102 आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांच्या देखरेखीखाली ही निवडणूक पार पडली आहे. त्या शिवाय भारताने मतदान प्रक्रियेसाठी मोठे सहकार्य केले. भारताची माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञांची टीमच सध्या मालदीवमध्ये आहे. मध्यावधी निवडणूक होणार नसल्याचा कायदा देशाने स्वीकारला आहे. त्यामुळे नाशीद यांच्या राजीनाम्याच्या 18 महिन्यानंतर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. वरिष्ठ न्यायाधीशाच्या अटकेच्या प्रकरणात सुरक्षा यंत्रणेने विरोधी पक्षासोबत हात मिळवणी करून नाशीद यांना पायउतार होण्यास भाग पाडले होते.