आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maliha Lodhi May Become Pakistani Foreign Minister

मलीहा लोधी बनणार पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्री ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानच्‍या माजी राजदूत मलीहा लोधी यांची देशाच्‍या काळजीवाहक सरकारमध्‍ये परराष्‍ट्रमंत्रीपदी निवड होण्‍याची शक्‍यता आहे. माध्‍यमांमध्‍ये आलेल्‍या वृत्तानुसार काळजीवाहक सरकारमध्‍ये त्‍यांच्‍या नावावर मोठयाप्रमाणात चर्चा सुरू आहे.

लोधी यांनी अमेरिका आणि ब्रिटनचे राजदूत म्‍हणून काम पाहिलेले आहे. पाकिस्‍तानी वृत्तपत्र डॉनच्‍या सूत्रांनी दिलेल्‍या हवाल्‍यानुसार काळजीवाहक पंतप्रधान मीर हजार खान खोसो हे लोधी यांच्‍याकडे परराष्‍ट्र मंत्री पदाचा पदभार देऊ शकतात.

खोसो यांनी कालच 14 सदस्‍यीय मंत्रिमंडळाची नियुक्‍ती केली होती. मात्र अर्थ, परराष्‍ट्र आणि संरक्षण विभाग त्‍यांनी स्‍वत:कडेच ठेवला होता. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार खोसो अद्यापही या पदासाठी योग्‍य व्‍यक्‍तीचा शोध घेत आहेत.