आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malik's Passport Will Be Cancelled After Reaching India

भारतात आल्यावर मलिकचा पासपोर्ट रद्द होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- अफजल गुरूच्या फाशीवरील इस्लामाबादमधील निषेध कार्यक्रमात सहभागी होऊन हाफिज सईदची भेट घेणा-या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासीन मलिकला आपल्या कृतीवर कसलाही पश्चात्ताप नाही. नुकतीच झालेली सईदची भेट ही योगायोग असल्याचा दावाही त्याने केला. दरम्यान, मलिकचा पासपोर्ट रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते यासीन मलिकचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानमध्ये असलेला मलिक भारतात परतल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. इस्लामाबादमधील उपोषण कार्यक्रमात सईदसोबत व्यासपीठावर सहभागी झाल्याचे मलिकविरोधी पुरावे मिळाले आहेत. मलिक परतल्यानंतर त्याची चौकशी देखील होणार आहे. त्याची चौकशी करून अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री आर.पी.एन सिंग यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

तिहारमध्ये नमाज
अफझलला फासावर लटकवल्यानंतर त्याचा दफनविधी तत्काळ उरकण्यात आला होता. त्यामुळे दफनविधी केलेल्या ठिकाणी फतिया नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती अफझलच्या कुटुबीयांनी केली होती. ती सरकारने मान्य केली आहे. केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी ही माहिती दिली. मात्र, भेटीची तारीख तिहारचे अधिकारीच ठरवतील.

सईदची भेट योगायोग
26/11 प्रकरणाचा मास्टरमाइंड सईदसोबत मलिकच्या फोटो आणि व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मलिकने ‘बीबीसी हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत स्वत:ची बाजू योग्य असल्याचा दावा केला आहे. अफझल गुरूला फाशी दिल्याच्या निषेधार्थ इस्लामाबादमध्ये प्रेस क्लबमधील उपोषणात आपण सहभागी झालो होतो. तेथे हजारो नागरिक एकत्र आले होते. त्यात हाफिज सईदही आला. सईदला मी आमंत्रित केलेले नव्हते, असे मलिकचे म्हणणे आहे. 2006 मध्ये मी हाफिज सईदसोबत चर्चा केली होती. त्यांच्यासोबत व्यासपीठावर देखील गेलो होतो. त्या वेळी आपण दहशतवादी म्होरक्याला शांतता प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या भेटीनंतर मात्र भारतात काहीही वादंग उठले नव्हते. असे का? असे मलिकने म्हटले आहे. आपल्याला दहा महिन्यांची मुलगी आहे. पासपोर्टसाठी तिच्या कागदपत्रांसंबंधी पाकिस्तानला गेलो होतो, असे सांगून मलिकने पाकिस्तानला जाण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मलिकची पत्नी पाकिस्तानची आहे.