आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्याळी आरजेंचा दुबईत विक्रमी शो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारतातील दोन रेडिओ जॉकींनी येथे सर्वात मोठा रेडिओ म्युझिक शो सादर करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नवा विक्रम स्थापन केला. दुबईत हा शो प्रसिद्ध आहे. मल्याळम एफएम 96.7 रेडिओ वाहिनीच्या सिंधू बिजू आणि मिथुन रमेश यांनी रविवारी रात्री सिंगापूरच्या 91.3 एफएमच्या दोन डीजेंचा विक्रम मोडित काढला.
सिंधू आणि मिथुन यांनी सोमवारी पहाटे 5.00 वाजेपर्यंत 84 तास 15 मिनिटे कार्यक्रम सादर केला. सिंगापूरच्या डीजेंच्या नावे 77 तास आणि 11 मिनिटांचा विक्रम आहे. सिंधू आणि मिथुन यांनी गुरुवारी सायंकाळी 5.00 वाजता कार्यक्रमाला सुरुवात केली. दोघांनी एकूण 2 तास 35 मिनिटे मिनिटे विश्रांती घेतली, त्यात त्यांनी केवळ 49 मिनिटे झोप घेतली. रविवारी दुपारी 10.12 वाजता गिनीज बुकचे प्रोजेक्ट मॅनेजर समेर खालोफ यांनी विक्रमाची घोषणा केली.