आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malyasian Airline News In Marathi, Travellers, Divya Marathi

मलेशियन विमानाचा शोध 77 लाख चौरस किमीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर/बीजिंग/वॉशिंग्टन - बेपत्ता मलेशियन विमानाचा 11 व्या दिवशीही थांगपत्ता नाही. 5 भारतीय प्रवाशांसह 239 प्रवासी असलेल्या या विमानात सर्वाधिक चिनी प्रवासी होते. त्यामुळे चीनने या विमानाचा आता आपल्या हद्दीतच शोध सुरू केला आहे. दहशतवादी हल्ल्याची किंवा अपहरणाची शक्यता पडताळताना चीनने आपल्या देशाच्या प्रवाशांत एकही दहशतवादी प्रवृत्तीचा नव्हता, असे जाहीर केले आहे. या विमानाचा 77 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात शोध सुरू आहे. विमानासंबंधीची माहिती मलेशिया जाहीर करत नसल्याच्या बातम्या आल्याने प्रवाशांच्या नातेवाइकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.