आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण दुष्काळ : खायला मिळाले नाही अन्न, त्याने मुलांनाच मारून खाल्ले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दुष्काळ माणसाला कोणत्या थराला नेईल हे सांगता येत नाही. उत्तर कोरियामध्ये एक व्यक्ती खायला अन्न न मिळाल्याने इतका त्रस्त झाला की, त्याने स्वतःच्या दोन मुलांनाच आपले भोजन बनवले. त्याच्या या घृणास्पद अपराधाबद्दल त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.

येथील दुष्काळाने भीषण परिस्थिती निर्माण केली होती. लोक अन्नाला पारखे झाले होते आणि ते आता नरभक्षक होण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर कोरियात एका आजोबाने आपल्या नातवाचे पुरलेले प्रेत उकरून काढले आणि खाल्ले तर दुस-या एकाने स्वतःच्या मुलाला गरम पाण्यात उकळून त्याचे मांस खाल्ले.

या भीषण दुष्काळाचे वार्तांकन आशिया प्रेसने केले असून त्याचा वृत्तांत संडे टाईम्सने प्रकाशित केला होता. आशिया प्रेसने दावा केला आहे की, त्यांना या बातम्या त्यांच्या सिटीझन जर्नालिस्टने दिल्या आहेत. दुष्काळामुळे या देशांमध्ये कुपोषण आणि मृत्यूदरही वाढला आहे.