आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : शुद्ध हवेसाठी प्रवाशाने उघडला विमानाचा आपतकालीन दरवाजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - शुद्ध हवा मिळावी यासाठी विमानाचा दरवाजा उघडण्याची घटना चीनमधील झेजियांग प्रांतातील हेंगझोऊ येथे घडली आहे. विमान टेकऑफ होण्याआधी विमानाचा दरवाजा उघडण्यात आला होता. चौकशी दरम्यान आपल्याला शुद्ध हवा मिळावी यासाठी आपण विमानाचा दरवाजा उघडला असे या प्रवाशाने सांगितले आहे.

त्याचे घडले असे की, रविवार (14) रोजी सिचुआन येथून शेंगदू जाणारे जियामेन एयरलाइंन्सच्या विमानात बसलेल्या एका प्रवाशाने दरवाजा उघडण्याचा प्रकार केला. जुइजिया नेनपेंगयू या व्यक्तीने या घटनेची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आपतकालीन दरवाजा उघडणा-या व्यक्तीला खिडकीदेखील उघडण्याची इच्छा होती असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यानंतर विमानात उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सने लगेच दरवाजा बंद केला आणि त्या प्रवाशाला दुस-या जागेवर बसण्यास सांगितले.

असाच काहीसा प्रकार 14 डिसेंबर, 2013 रोजी सिचुआन एयरलाइंसमध्ये देखील घडलाहोता. ज्यामध्ये एका प्रवाशाने लैंडिंग दरम्यान विमानाचा दरवाजा उघडला होता. यानंतर त्या प्रवाशाला 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती.