आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Saves 2 Million Babies Donating Rare Type Of Blood

दुर्मिळ रक्‍तगट असलेल्‍या जेम्‍स यांनी रक्‍तदान करुन 20 लाख बालकांचे वाचविले प्राण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्‍ट्रेलियामध्‍ये जन्‍मलेले जेम्‍स यांनी आतापर्यंत रक्‍तदान करुन 20 लाख बालकांचे प्राण वाचविले आहेत. 74 वर्षीय जेम्‍स यांच्‍या या कार्यामुळे त्‍यांची सुपर‍हीरोशी तुलना होत आहे.

जेम्‍स यांच्‍या रक्‍तातील प्‍लाज्‍मामध्‍ये अशा काही अॅन्टीबॉडीज आहेत, की त्‍यामुळे मुलांच्‍या शरीरातील न्‍यूमोनियाला त्‍या प्रतिबंध घालतात. वयाच्‍या 18 व्‍या वर्षांपासून जेम्‍स दर आठवड्याला रक्‍तदान करतात. गेल्या 56 वर्षांमध्‍ये त्‍यांनी आतापर्यंत हजारहून अधिक वेळा रक्‍तदान केले आहे.

सनशाइन कोस्‍ट, दक्षिण ऑस्‍ट्रेलिया, पश्चिम ऑस्‍ट्रेलिया, तस्‍मानिया इत्‍यादी देशांमध्‍ये त्‍यांनी रक्‍तदान केले आहे.
''मी 14 वर्षांचा असताना माझ्या छातीवर एक शस्‍त्रक्रिया झाली होती. त्‍यावेळी मला 13 लीटर रक्‍त लागले होते. तेव्‍हापासूनच मी ठरवले, की होईल तेवढे रक्‍तदान करेन,'' असे जेम्‍स यांनी सांगितले.

आरएच बाधित रुग्‍णांना जेम्‍सच्‍या रक्‍तामुळे जीवदान मिळाले आहे. कित्‍येक गर्भवती महिलांना त्‍याच्‍या रक्‍ताने तारले आहे.