आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 दिवस जमिनीच्या आत 3300 फुट खाली अडकला होता संशोधक, 5 देशांनी मिळून वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जोहानला गुहेतून काढताना बचावदल)
बर्लिन - गेल्या 12 दिवसांपासून जमिनीच्या आत 3300 फूट खाली गुहेत अडकलेले 52 वर्षीय जोहान वेस्टथॉसेर यांना गुरूवारी वाचवण्यात बचाव दलाला यश आले.

जर्मनीतील सर्वात खोल असलेल्या गुहेत जोहान 8 जूनला अडकले होते. विशेष म्हणजे व्यवसायाने संशोधक असलेले जोहान यांनीच 1995 ला रिसेंडिंग केव्ह नावाच्या या गुहेचा शोध लावला होता. यापूर्वीही अनेकवेळा जोहान या गुहेमध्ये उतरले आहेत.
या महिन्याच्या 8 जूनला जोहान काही संशोधक कार्यकर्त्यांसोबत संशोधनासाठी गुहेत उतरले होते. गुहेत संशोधन करत असताना जोहान यांच्यावर दरड कोसळली. त्यामुळे जोहान आतच अडकले. जोहान यांना वाचवण्यासाठी त्यांच्या सोबतच्या लोकांना तब्बल 12 तास लागले. जोहान यांना वाचवल्यानंतर बचाव दलाच्या कर्मचार्‍यांनी या बचावकार्याची तुलना माऊंट एव्हरेस्टवर चढलेल्या व्यक्तीला खाली उतरवण्याशी केली आहे.
गंभीर जखमी असूनही आत्मविश्वास कायम
गुहेत अडकलेल्या जोहान वेस्टथॉसर यांना गुरूवारी दुपारी बाहेर काढण्यात आले. जोहान यांना डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे ही बचावदलासमोर सर्वात मोठी समस्या होती. दरड अंगावर कोसळल्याने जोहान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. एवढेच नाही तर जोहान ज्या ठिकाणी अडकले होते तेथील तापमान 3 डिग्री सेल्सियस एवढे होते.
थंडीमुळे जोहान यांची तब्येत वेगाने खराब होत होती. मात्र डॉक्टरांकडे नेईपर्यंत जोहान यांचा आत्मविश्वास कायम होता. बचावदलाला पाहिल्यानंतर त्यांचे पहिले शब्द "Don't Worry, I am ok" असे होते.

पुढील स्लाईडमध्ये पाहा... जोहानला वाचवताना बचावदल...