आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरे मॅन व्हर्सेस वाइल्ड.. ७९ वर्षांचे रुडियर नेबर्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - रुडियरनेबर्ग हे जगातील सर्वात ज्येष्ठ मानव उत्क्रांती तज्ज्ञ मानले जातात. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत उपलब्ध स्रोतांच्या आधारे सुरक्षित जिवंत राहणाऱ्या व्यक्तीला सर्व्हायवल म्हणजेच मानव उत्क्रांती तज्ज्ञ असे म्हटले जाते. रुडियर यांच्या पुस्तकावरूनच जर्मन सैनिक प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचे धडे घेतात.

वयाच्या चौथ्या वर्षीच ते आई-वडिलांना सांगता घरातून एकटेच बाहेर पडले होते. तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू होते. एवढे लहान असतानाही ते दोन दिवस शहराजवळील जंगलात सुरक्षित राहिले. नंतर पोलिसांनी त्यांना शोधून काढले. शिक्षण पूर्ण केले पेस्ट्री शेफ बनले. त्यातही त्यांचे मन रमले नाही. ते अनेकदा सांगताच, ज्या वाटेवरून पुन्हा परतणे अशक्य आहे, अशा रस्त्याने, घनदाट जंगलात निघून जात. त्यांनी अनेक वाळवंट, समुद्र पार केले. तेदेखील केवळ नैसर्गिक स्रोतांच्या आधारे. २५ वेळा त्यांनी शस्त्रधारी गुंडांचाही सामना केला. जर्मनीत त्यांना ‘सर सर्व्हायवल’ असे म्हटले जाते. जगातील ज्येष्ठ सर्व्हायवल एक्स्पर्टच्या खडतर आयुष्याविषयी ही अाणखी वास्तव.

१९८१ मध्येसंपूर्ण जर्मनीत कोणत्याही वाहनाविना नैसर्गिक स्रोतांच्या आधारे त्यांनी प्रवास केला.
१९८७मध्येपॅडल बोटीने अटलांटिक महासागर पार केला.
१९७९ मध्येदोन मित्रांच्या मदतीने त्यांनी पूर्ण नाईल नदी पार केली. तेदेखील घरात तयार केलेल्या बोटीच्या मदतीने.
१९८०मध्येयानोमामी अमेरीइंडियन आदिवासींची घरांसाठी मोठ्या औद्योगिक कंपन्यांशी संघर्ष .
जर्मनीतील हँबर्ग येथील नहरीत बोट चालवताना रुडियर.
ग्रिल्स आणि रुडियर यांमधील फरक
ब्रिटिशनागरिक, सर्व्हायवल एक्स्पर्ट बेयर ग्रिल्स हे ४० वर्षांचे आहेत. मॅन व्हर्सेस वाइल्ड या शोमुळे बेअर यांना प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांनी ब्रिटनच्या स्पेशल फोर्स ‘द सास’ (स्पेशल एअर सर्व्हिस) मध्ये काम केले आहे. शो सुरू असताना त्यांच्यासोबत डॉक्टरांची टीम असते. गंभीर दुखापत झाल्यास ते ग्रिल्स यांच्यावर उपचार करतात.