आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेल्सन मंडेलांचा औषधोपचारास सकारात्मक प्रतिसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला हे उपचाराला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. बुधवारी रात्री त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसातील संसर्गामुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या चार महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही तिसरी वेळ आहे.
शांततेचा नोबेल मिळालेले 94 वर्षीय मंडेला यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी औषधोपचाराला ते प्रतिसाद देत असल्याचे गुरूवारी सांगितले आहे.
डॉक्टरांना त्यांचे काम करू दिले गेले पाहिजे. त्यांच्या व्यक्तिगत गोष्टींमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सहा महिन्यांपूर्वी मंडेला 18 दिवस उपचारासाठी दाखल होते.