आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडेला यांची प्रकृती बरी, पत्नी ग्रेसा माकेल यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती मागील आठवड्यापेक्षा बरी आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना काळजी कमी झाल्याची प्रतिक्रिया मंडेला यांच्या पत्नी ग्रेसा माशेल यांनी व्यक्त केली आहे.
94 वर्षीय मंडेला पाच आठवड्यांपासून रुग्णालयात आहेत.

गेल्या आठवड्यात ते ‘अचेतन स्थिती ’ मध्ये असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष जॅकोब झुमा यांनी फेटाळून लावला होता. त्या अगोदर त्यांच्या अवस्थेवरून मृत्यूची चर्चा सुरू झाली होती. सध्या गे्रसा या रुग्णालयात सातत्याने मंडेला यांच्या जवळ आहेत. माशेल या मंडेला यांच्या तिस-या पत्नी आहेत. त्यांचा विवाह मंडेला यांच्या 80 व्या वर्षी झाला होता. पुढील आठवड्यात मंडेला यांचा 95 वा वाढदिवस आहे. हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.