आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सालींसकट आंबे खा वजन घटवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- आंबा पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटते पण जिभेवर नियंत्रण ठेवून आंबे खाल्यास आपले वजन घटू शकते. पण आंबे खाताना एक खबरदारी घ्यायची ती म्हणजे आंब्याचे सालही खाल्ले तर वजन घटवता येणे शक्य होते असा दावा आॅस्ट्रेलियातील शास्त्रज्ञानी केला आहे.
क्विन्सलँड विद्यापीठाचे संशोधकांनी हा दावा केला आहे. आंबे खाताना काही विशिष्ट जातींचे आंबे खाल्ल्यास त्याला उलट परिणाम होऊ शकतो अर्थात वजन वाढू शकते असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोणते आंबे खावेत त्याचेही उदाहरण त्यांनी दिले आहे पण यामध्ये भारतीय प्रकार दिलेले नाहीत. शास्त्रज्ञांच्या मते नेहमी आढळणारे आयर्विन अथवा नाम दोक माई या आंब्यामध्ये मानवी शरीरात फॅटस् घटवणारे घटक असतात. तर या उलट
केनसिंगटन प्राइड आंबे शरीरात असलेल्या फॅट पेशींच्या वाढीला लगाम घालतात.
तीनही आंब्याच्या जातींमधील मेद वाढवणा-या पेशीं शोधण्यात प्रयोगशाळेत यश आले आहे. या संशोधनामुळे लठठपणाला रोखण्यात यश येऊ शकते. परंतु आणखी त्यावर बरेच संशोधन करावे लागणार आहे. शरीरातील मेद वाढवणा-या पेशींना कोणते घटक कारणीभूत ठरतात ते शोधण्याचे काम आता करावे लागणार आहे असे माईक गिडली या शास्त्रज्ञांनी सांगितले.