आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manmohan Singh Arrived In G 20 Summit At Saint Pitarsburg

जी 20 परिषदेवर जागतिक आर्थिक मंदीचे सावट जाणवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट पीटर्सबर्ग - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आठव्या जी 20 परिषदेत भाग घेण्यासाठी रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात पोहोचले आहेत. भारतासह जगातील अनेक देशांत आर्थिक संकट, मंदीसारखी स्थिती व सिरियामध्ये जमा झालेल्या युद्धाच्या ढगामुळे या शिखर परिषदेवर सा-या जगाचे लक्ष आहे.


पंतप्रधान विकसित देशांच्या अपारंपरिक मुद्रा धोरणातून भारतासह उभरत्या अर्थव्यवस्थेला भेडसावणा-या समस्या परिषदेत मांडतील. देशात आंतरराष्टÑीय गुंतवणूक वाढवण्यावर त्यांचा भर असेल. भारतात संसदेचे अधिवेशन सुरू आहे. आर्थिक संकटाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारवर निशाणा साधण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत पंतप्रधानांनी जगातील देशांसमोर केलेले विवेचन देशातील राजकारणासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


अमेरिकेचे आर्थिक मदत पॅकेज मागे घेतल्यामुळे भारत आणि अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांसमोरील समस्यांचा सामना करण्यासाठी सर्वंकष योजना लागू करण्यावर पंतप्रधान भर देतील. सिरियाच्या स्थितीवरून अमेरिका व रशियात निर्माण झालेले मतभेद परिषदेत जाणवतील. अमेरिकी फेडरल रिझर्व्हचा रोखे खरेदी कार्यक्रम हळूहळू समाप्त करण्याच्या प्रकरणात उभरत्या अर्थव्यवस्था व अमेरिकेतील मतभेद, भारत आणि अन्य चा ब्रिक्स देशांमध्ये(ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका) वृद्धी दरात होत असलेल्या घसरणीचा मुद्दा परिषदेत गाजण्याची शक्यता आहे. शिखर परिषदेला रवाना होण्याआधी सिंग यांनी जारी केलेल्या वक्तव्यात देशातील गैरपारंपरिक मुद्रा धोरणातून योग्य पद्धतीने बाहेर पडण्यावर भर दिला. 2008 च्यास जागतिक आर्थिक मंदीनंतर विकसित जगाकडून गैर पारंपरिक धोरण अवलंबिली जात आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. वॉशिंग्टनमध्ये 2008 मध्ये पहिली जी 20 परिषद झाली होती. या परिषदेतही मनमोहन सहभागी झाले होते.