आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : मंसूर एजाज यांना अखेर व्हिसा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पाकिस्तानात मेमोगेट प्रकरणावरुन महाभारत घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच त्याच्याशी संबंधित असलेले मूळचे पाकिस्तानी व सध्या अमेरिकेस्थित उद्योगपती मंसूर एजाज हे सर्वोच्च न्यायालयात साक्ष देण्यासाठी पाकिस्तानमध्ये येणार आहेत. त्यासाठी त्यांनी स्वित्झर्लंडमधील पाकिस्तानी दुतावासाकडे अर्ज दिला होता. त्यानंतर त्यांना तेथून व्हिसा देण्यात आला आहे.
मंसूर एजाज हे १६ जानेवारी रोजी पाकमधील सुप्रीम कोर्टात मेमोगेट प्रकरणाची साक्ष देण्यासाठी हजर राहणार होते. पण त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना फोनवरुन धमकी दिल्याने त्यांनी २५ जानेवारीप्रर्यंत मुदत मागितली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने त्यांना 25 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांना व्हिसा देण्यात आला आहे. मेमोगेट प्रकरणात मंसूर एजाज यांच्यावर झालेल्या आरोपांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी व साक्ष देण्यासाठी पाकिस्तानला जाणार असल्याचे एजाज यांनी सांगितले होते.
काय आहे मेमोगेट?- 2 मे रोजी ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केल्यानंतर पाकिस्तानी लष्कर सरकार उलथवू शकते म्हणून झरदारी यांनी अमेरिकेचे लष्करप्रमुख माईक मुल्लेन यांच्याकडे मदतीची याचना करणारे पत्र पाठविले होते.हे प्रकरण उद्योगपती मंसूर एजाज यांनी उघडकीस आणले होते. या घटनेनंतर लष्कर व सरकार यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला. मेमोगेट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चौकशी आयोग नेमला असून याच आयोगासमोर एजाज साक्ष देणार आहेत.