आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manuel Uribe, Former World's Heaviest Person, Dies At 48

जगातील सर्वात स्थूल व्यक्ती मॅन्युअल युराइबचा मृत्यू, 558 किलो होते वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिको - एकेकाळी जगातील सर्वात स्थूल व्यकती म्हणून गिनीज बूकमध्ये विक्रम नोंदवणा-या 48 वर्षीय मॅन्युअल युराइब याचे सोमवारी निधन झाले. दोन मे रोजी हृदयाच्या ठोक्याची गती मंदावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. 2006 मध्ये जेव्हा युराइब यांनी विक्रम नोंदवला होता, त्यावेळी त्यांचे वजन 558 किलो होते.

स्थूल शरीरामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते बेडवरच होते. चालणे, फिरणेही त्यांना शक्य नव्हते. युराइबने एका चैनलला सांगितले होते की, 1992 मध्ये जेव्हा त्यांचे वय 26 होते, त्यावेळी त्यांचे वजन 113 किलो होते. मात्र खाण्याच्या वाईट सवयीमुळे अचानक त्याचे वजन वाढायला लागले होते. त्यामुळेच 2002 नंतर त्यांना चालणे फिरणेही शक्य होत नव्हते. पण लग्नासाठी त्यांनी 250 किलो वजन कमी केले होते.

पुढे वाचा - मॅन्युअल युराइबचे काही जुने फोटोज...