आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many Indian Origin Standing Election In Australia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाचे अनेक नेते मैदानात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय वंशाचे अनेक नेते मैदानात उतरले आहेत. आगामी महिन्यात होणार्‍या निवडणुकीत एकूण 50 राजकीय पक्ष नशीब आजमावत आहेत.

लेबर पार्टीने व्हिक्टोरिया मेंजिस मतदारसंघातून मनोजकुमार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. माजी इमिग्रेशन मंत्री केव्हिन यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहेत. भारतीय वंशाचा डॉक्टर मोहंमद हनीफचा 2007 मध्ये व्हिसा रद्द केल्याप्रकरणी केव्हिन वादात अडकले होते.

व्हिक्टोरियाच्या स्कलिन आणि विल्स मतदारसंघातून लिबरल पार्टीतर्फे भारतीय वंशाचे जग चुगा व शिल्पा हेगडे निवडणूक लढवत आहेत. क्लाइव्ह पॉमर यांच्या नेतृत्वाखालील पॉमर युनायटेड पार्टीनेही भारतीय वंशाचे उमेदवार दिले आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलियातील पीयूपी मतदारसंघात विशाल शर्मा व विमल शर्मा यांची उमेदवारी आहे. व्हिक्टोरियाच्या आयझ्ॉक जागेसाठी अवतार गिल उभे आहेत. ट्वेंटी फस्र्ट सेंच्युरी ऑस्ट्रेलिया नावाच्या पक्षाने व्हिक्टोरियातील बॅटमॅन मतदारसंघातून बिल गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी गेल्या आठवड्यात विकिलीक्स पार्टीच्या सात उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये दोन भारतीय वंशाचे नागरिक आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संसदेमध्ये अद्याप कोणताही भारतीय वंशाचा नागरिक पोहोचू शकला नाही. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचे साधारण 4.5 लाख नागरिक आहेत.


निवडणुकीची वैशिष्ट्ये
> 1925 पासून मतदान करणे सक्तीचे आहे. ऑस्ट्रेलियात 7 सप्टेंबरला मतदान होईल.
> संसदेत दोन सभागृहे : हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह तसेच सिनेट हाऊसमध्ये 150 जागा व सिनेटच्या 76 जागांमध्ये 40 जागांसाठीच निवडणूक.
> ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय अद्यापही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुख आहेत.
> गव्हर्नर जनरल क्वेंटिन ब्राइस महाराणीचे प्रतिनिधी आहेत.