आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये शहरीकरणामुळे शेकडो गावे ओस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाºया चीनसमोर शहरीकरणाची भीषण समस्या आ वासून उभी आहे. एकीकडे अनेक नवीन शहरे झपाट्याने वसत असताना दुसरीकडे मात्र असंख्य गावे ओस पडू लागली आहेत. अशी गावे बकाल झाल्याने त्यांचे वर्णन ‘घोस्ट सिटीज’ असे केले जात आहे.


देशाने महासत्ता होण्यासाठी सुरू केलेला विकास अनेक अर्थांनी अडचणीचा ठरताना दिसू लागल्याची जाणीव चिनी प्रशासनाला होऊ लागली आहे. कारण मध्यम आकारातील शहरांमध्ये नवीन प्रगत शहरात रूपांतरित होण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळे माणसांशिवाय रिकाम्या शहरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे, असे देशाच्या केंद्रीय शहरी विकास विभागाचे उपाध्यक्ष क्युओ रनलिंग यांनी सांगितले.


संख्या वाढली
चीनमध्ये गेल्या काही वर्षांतील शहरांची संख्या कमालीची वाढली आहे. मध्यम व निमशहरी भागही खूप वाढला आहे. त्यातून अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. देशाच्या मध्य व पश्चिम प्रदेशाला शहरीकरणाने विळखा घातला आहे.


वास्तव बाहेर
देशाच्या सीसीटीव्ही या सरकारी दूरचित्रवाणीने अलीकडेच एक वास्तवदर्शी वृत्तांकन केले होते. त्यात दोन शहरांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. या शहरांतील व्यापारी संकुलात कोणीही गाळा घेण्यास धजावत नाही. कारण दोन्ही शहरांत चिटपाखरूही दिसत नाही.


83.41 टक्के देशात काँक्रिटीकरण
2000 ते 2010 या काळात शहरीकरणात वाढ
50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरात.