आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Article About Time Magazine, Divya Marathi, America

‘टाइम’ मासिकात 91 वर्षांनंतर मोठे फेरबदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. हे मासिक आतापर्यंत टाइम वॉर्नरच्या लिस्टमध्ये होती. आता वॉर्नरपासून टाइम विभक्त करण्यात आले आहे. कंपनीचे दायित्व कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे टाइम इंकचे नवे कार्यकारी प्रमुख जोसेफ रिप यांनी म्हटले आहे. 3 मार्च 1923 रोजी टाइमचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 91 वर्षांच्या कारकीर्दीत कंपनीचा सर्वात मोठा निर्णय आहे. अमेरिकेत या अंकाची सुरुवात झाल्यानंतर युरोप, आशिया, मध्य-पूर्व, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण महासागरापर्यंत याचे प्रकाशन होते. दोन कोटी 80 लाख वाचकसंख्या असलेले जगातील सर्वाधिक खपाचे मासिक आहे. यात दोन कोटी अमेरिकन वाचकांचा समावेश आहे. 2013 पर्यंत या मासिकाच्या 33 लाख प्रती निघत होत्या. टाइम इंकचा पाया अशाच प्रकारे मजबूत राहील, असे सांगण्यात येते.

शेअर्सची किंमत घसरली
सोमवारपासून शेअर बाजारात टाइम इंक स्वतंत्र कंपनीच्या स्वरूपात लिस्टेड करण्यात आली आहे. सुरुवातीला याच्या शेअर्समध्ये घसरण झाली. वॉर्नरपासून वेगळे निघाल्यानंतर ‘टाइम वॉर्नर’च्या भागधारकांना टाइम इंकचे शेअर्स दिले जातील. याची किंमत 3600 कोटी इतकी असेल.

7800 कोटी कर्ज
टाइम इंकचा नवा प्रवास 7800 कोटी कर्जाने सुरू झाला आहे. शेअर बाजारातील विश्लेषकांच्या मते टाइम इंकचे भवितव्य सध्या तरी अनिश्चित राहील. ही कंपनी गुंतवणुकीच्या यादीत नाही.

90 मासिकांचे प्रकाशन
हा समूह टाइमबरोबरच लाइफ, पीपल, एंटरटेनमेंट वीकली, स्पोटर््स इलस्ट्रेटेडसारख्या 90 मासिकांचे प्रकाशन आणि 45 वेबसाइट्स चालवत होता. आता टाइम इंकचे प्रकाशन वेगळ्या कंपनीच्या रूपाने होत आहे. वॉर्नर ग्रुप अन्य मासिकांचे प्रक ाशन करत राहील. वॉर्नर ग्रुपकडे एचबीओ चॅनल आणि वॉर्नर स्टुडिओसुद्धा आहे.

उत्पन्नात सातत्याने घट
2006 मध्ये कंपनीला 6 हजार कोटी रुपये इतके उत्पन्न होते. महसुली उत्पन्नात सातत्याने घट होऊन 2220 कोटी इतके झाले. गेल्या 24 तिमाहींपैकी 22 तिमाहींत उत्पन्न सातत्याने घटले आहे. या ग्रुपने अन्य कंपन्यातून बरीच मोठी कमाई केली आहे.

मुखपृष्ठ चर्चेत
‘टाइम पर्सन ऑफ द इअर’ मोस्ट पॉवरफुल मॅनची निवड करण्यासाठी टाइमची ओळख होती. या मासिकाच्या मुखपृष्ठाची इतकी चर्चा व्हायची की ज्याचा चेहरा त्यावर असेल त्यांची वेगळी ओळख निर्माण व्हायची. जॉर्ज बुश, चार्ली चॅप्लिन, मायकेल जॅक्सन, 9/11 चा हल्ला, यांसारख्या अनेक व्यक्तींना आणि प्रसंगांना मुखपृष्ठावर स्थान मिळाले. टाइमचे मुखपृष्ठ कधी कधी वादातही सापडले आणि माफी मागावी लागली.
nytimes.com