आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Doctor Was Present In The Team Who Made Delivery Of Kate Midelton

युवराज्ञी केट मिडलटनचे बाळंतपण मराठी डॉक्टरच्या देखरेखीत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटिश युवराज्ञी केटचे बाळंतपण करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकात मराठी डॉक्टरचाही समावेश होता. लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयातील डॉ. सुनीत विनोद गोडांबे असे या मराठमोळ्या डॉक्टरचे नाव आहे. दरम्यान, नवजात प्रिन्सला पाहण्यासाठी जगभरातील लाखो लोक आतुर आहेत. एवढेच नव्हे, बाळाचे नाव काय असेल यावरही सट्टा लावला जात आहे.

ब्रिटिश राजघराण्यातील पाहुण्याबद्दल जगभरात उत्सुकता होती. केम्ब्रिजची राजकुमारी केटच्या बाळंतपणासाठी महाराणी एलिझाबेथ (द्वितीय)चे माजी प्रसूतितज्ज्ञ मार्कस सेशेल यांच्या नेतृत्वाखाली सेंट मेरी रुग्णालयातील तज्ज्ञांचे खास पथक तयार होते. यात नवजात अर्भक तज्ज्ञ डॉ. गोडांबे यांच्यासह गाय थोर्प, अ‍ॅलन फार्दिंग यांचा समावेश होता.
2013 चांदीची नाणी
शाही बाळासोबत याच दिवशी जन्मलेल्या 2013 बाळांना शाही घराण्याच्या वतीने भेट म्हणून चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. यासाठी पालकांना facebook.com/theroyalmint या वेबसाइटला भेट देऊन आपल्या बाळाच्या जन्मतारखेची जन्माच्या अधिकृत दाखल्यासह नोंदणी करावी लागेल. यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एका नाण्याची किंमत 28 पाउंड आहे.