आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Margaret Thatcher, Britain's First Female PM, Dead At 87

ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान व माजी पंतपधान मार्गारेट थॅचर यांचे सोमवारी निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. मार्गारेट थॅचर यांना दुस-या महायुद्धानंतर एक जागतिक पॉवरफुल नेत्या म्हणून मान मिळाला. त्यांना भारतातील इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच 'आयर्न लेडी' ही उपाधी जागतिक पातळीवर मिळाली होती.

थॅचर यांनी मजूर पक्षाचे नेतृत्त्व 1979 ते 1990 या काळात केले होते. थॅचर 2002 मध्ये आजारपणामुळे सार्वजिनक जीवनातून निवृत्त झाल्या होत्या.