आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Margaret Thatcher's Funeral: 'Lying Here, She Is One Of Us'

ब्रिटनच्या ‘इंदिरा गांधीं’ना अखेरचा निरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयर्न लेडी मार्गारेट थॅचर यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. थॅचर यांचा ‘ब्रिटनच्या इंदिरा गांधी’असाही गौरवाने उल्लेख केला जातो. सर्वाधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवणा-या थॅचर यांचे 8 एप्रिल रोजी 87 व्या वर्षी निधन झाले होते. वेस्टमिनिस्टर पॅलेसपासून सेंट कॅथेड्रलपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विरोधही... थॅचर यांची अंत्ययात्रा सुरू असताना प्रत्येक मिनिटाला टॉवर ऑफ लंडनवरून बंदुकीची सलामी देण्यात होती. संसद भवनामधील बिग बेन बेलचा घंटानाद बंद ठेवण्यात आला होता. अंत्ययात्रा सुरू असताना काही ठिकाणी विरोधी निदर्शनेही झाली. ‘पैशाचा अपव्यय’असल्याच्या घोषणा निदर्शक देत होते.