आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडच्या सर्वात मादक अभिनेत्रीच्या मृत्यूचे रहस्य आजही रहस्यच, वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडमध्‍ये तीन त्रिदेव आहेत, असे म्हटले जाते. त्यात मार्लोन ब्रँडो, अल पसीनो आणि रॉबर्ट डी न‍ीरो यांचा समावेश होतो. जर अभिनेत्रींचे नाव घेतल्यास आजही मर्लिन मन्रो आघाडीवर आहे. 50 आणि 60 च्या दशकात एक मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि आपल्या मादकतेसाठी प्रसिध्‍द असलेली मन्रोचे आयुष्‍य हे एखाद्या चित्रपटातील रीलप्रमाणे होते. त्यात नाट्य, दु:ख रोमांच यांचा समावेश होता.
आजच्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 1962 रोजी मर्लिन मन्रोने जगाचा निरोप घेतला होता. 1953 मध्‍ये आलेला मेलोड्रामा चित्रपट 'नियाग्रा' मध्‍ये तिने केलेले अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. मन्रोचे मादक डोळे आणि सोनेरी केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडायची. 1955 मध्‍ये आलेला 'द सेव्हन ईयर इच' या चित्रपटामध्‍ये तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. चित्रपटांमध्‍ये मन्रोचे हवेत उडत असलेले स्कर्टचे दृश्‍य कैद करण्‍यासाठी जगभरातून प्रयत्न झाला. पण तिच्यासारखी अदा दाखवण्‍यात सर्व सिनेतारिका फ‍िक्या पडल्या. 1999 मध्‍ये अमेरिकन फ‍िल्म इन्स्‍टीट्यूटने मन्रोला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले.

अवघ्‍या 36 व्या वर्षी मर्लिन राहत्या घरी मृत अवस्थेत आढळली. झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्याने तिचा मृत्यू झाला, असे डॉक्टरने सांगितले होते. तिने आत्महत्या केली, असेही मानले जाते. पण अद्याप तिच्या मृत्यूचे कोडे सुटलेले नाही. मन्रोने तीन वेळेस विवाह केला. पहिला जेम्स डोहर्टी, दुसरे जो डीमॅगो आणि तिसरे आर्थर मिलर यांच्याबरोबर विवाहा केले.

पुढे पाहा मर्लिन मन्रोच्या आयुष्‍यातील क्षणचित्रे....