ग्वाँगॅग - अमेरिकेन अभिनेत्री मर्लिन मन्रोच्या ऐतिहासिक फोटोवरून तयार करण्यात आलेला पुतळा सध्या चीनच्या एका भंगारात पडून आहे. ग्वांग्झी झुआंग प्रांतातील ग्वाँगॅगमध्ये चिनी कलाकारांनी अतिशय कठोर परिश्रमातून मन्रोला जणू जिवंत साकारले होते. तो सार्वजनिक ठिकाणाची शोभा वाढवणारा होता; परंतु आता याला कोणतेही कारण न देता हटवण्यात आले आहे. सध्या भंगार खरेदी करणा-या एका कंपनीने हा पुतळा विकत घेतला आहे. आता त्याला नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मन्रोचे स्कर्टमधील हे दृश्य अमेरिकेच्या ‘द सेव्हन इयर इच’मध्ये दाखवण्यात आले होते.
पुढे वाचा पुतळ्याच्या लांबी व वजनाविषयी....