वॉशिंग्टन- जगभरातील विकसीत आणि विकसनशिल राष्ट्रामध्ये झपाट्याने लोकप्रीय होणा-या
फेसबुकच्या सर्व्हरची कॉपी अमेरिकन गुप्तचर संस्थेने केली असल्याचा आरोप फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग यांनी केला आहे. एका हवालानुसार ही माहिती झुकेरबर्ग यांना मिळाली. या सदंर्भात झुकेरबर्गने अमेरिकेचे राष्ट्रध्याक्ष बराक ओबामांशी चर्चा केली. अशा प्रकारची काम अमेरिकन गुप्तचर संस्थेने केल्यामुळे झुकेरबर्गने नाराजी व्यक्त केली आहे. ही माहिती झुकेरबर्ग यांनी आपल्या ब्लॅागवर दिली आहे.