आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage With Pakistani Women Banned For Saudi Men

पाकिस्तानी, बांगलादेशी नवरीला सौदीत मनाई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - सौदी अरेबियामध्ये यापुढे पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर दोन देशांतील महिलांशी विवाह करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील पुरुष मंडळींना पाकिस्तानी नवरी करता येणार नाही.

पाकिस्तान, बांगलादेश, चाड, म्यानमार या देशांतील महिलांशीदेखील सौदीतील पुरुषांना विवाह करता येणार नाही. सौदीमध्ये मुस्लिम राष्ट्रातील महिलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विवाहासाठी मोठ्या प्रमाणात अनुकूलता आहे, परंतु सरकारने हा प्रतिबंध घातल्याने उपवरांना परदेशी महिलांसोबत विवाह करण्याच्या विचारांना मुरड घालावी लागणार आहे. त्यातूनही विवाह करण्याची इच्छा असलेल्या पुरुषांना अत्यंत कडक नियमांची प्रक्रिया पार पाडावी लागेल.

देशात परदेशी महिलांशी विवाह न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, परंतु त्यानंतरही पाकिस्तानी किंवा परदेशी महिलांशी विवाह करण्याची इच्छा असलेल्या पुरुषांनी सरकारकडून लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिलांना आपली सहमती दर्शवणारे पत्र दाखल करावे लागेल. त्याचबरोबर विवाहविषयक अर्जदेखील सादर करावा लागणार आहे.

हिजाब न घातल्याने सौदीत वादंग
सौदी अरेबियातील एका महिला वृत्तनिवेदिकेने हिजाब न घालता वृत्तनिवेदन केले. येथील सरकारी ‘अल अखबरिया’ वृत्तवाहिनीत हा प्रकार घडला. निवेदिकेचे नाव कळू शकले नाही. सोशल मीडियावर तिच्या बुलेटिनची क्लीप वेगाने वायरल झाली. ही महिला लंडन येथून रिपोर्टिंग करत होती. इस्लामच्या कायद्यांचे कडक पालन करणार्‍या सौदीत यामुळे वादंग निर्माण झाले. ही महिला ब्रिटन स्टडिओतून वृत्तनिवेदन करत होती. मात्र सौदीच्या मूल्यव्यवस्थेवर हे आक्रमण असल्याची प्रतिक्रिया सरकारी टीव्हीचे प्रवक्ते सालेह अल मुहालिफ यांनी दिली. अल अखबरिया वाहिनीवर अनेक महिला अँकर आहेत मात्र त्यांना हिजाब अनिवार्य आहे.

लग्नाळूंची नाराजी
सौदी सरकारने घेतलेला निर्णय देशातील लाखो उपवरांना नाराज करणारा ठरला आहे. परदेशी महिलांशी विवाह करू इच्छिणार्‍या पुरुषांचा हिरमोड झाल्याचे मानले जाते. सौदीत पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अरब देशातील मुलींची विवाह करण्याचे प्रमाण जास्त आहे.