आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mars Age Below 10 Crore Years, New Research Tell

खगोलीय घडामोडी: चांदोबाचे वय 10 कोटी वर्षांनी कमी, नव्या संशोधनातील निष्‍कर्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - पृथ्वीच्या चंद्राचे वय 4.4 अब्ज ते 4.45 अब्ज वर्षे आहे. म्हणजेच याआधी कल्पना केल्यापेक्षा हे वय 10 कोटी वर्षांनी कमी आहे. हा दावा नव्या अध्ययनात करण्यात आला आहे.


सुमारे 4.56 अब्ज वर्षांपूर्वी एक रहस्यमय ग्रह पृथ्वीवर आदळला आणि चंद्राची निर्मिती झाली, असे चंद्राच्या निर्मितीचा लोकप्रिय सिद्धांत सांगतो. मात्र चंद्रावरील दगडांचे नव्याने विश्लेषण करण्यात आले असून प्रत्यक्षात 4.4 अब्ज आणि 4.45 अब्ज वर्षांपूर्वी हा प्रचंड मोठा स्फोट होऊन त्याचे अवशेष अंतराळात विखुरले होते, असे स्पेस डॉट कॉम या वेबसाइटने म्हटले आहे. त्यामुळे पृथ्वीबाबतच्या समजुती बदलणार आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.


काय आहेत गृहीतके?
०महास्फोटानंतर नाट्यमय निर्मिती झाल्यानंतर पृथ्वीचा चंद्र विरघळलेल्या दगडांच्या महासागरातून घरंगळत गेला, अशी एक सार्वत्रिक धारणा आहे. त्या चांद्र दगडाचे प्रत्यक्ष वय 4.360 अब्ज वर्षे आहे.
०सुमारे 4.45 अब्ज वर्षांपूर्वी रहस्यमय महास्फोटानंतर पृथ्वी अनेक ठिकाणी विरघळल्याच्या खाणाखुणा शास्त्रज्ञांना आढळल्या.
०चंद्राची निर्मिती आणि पृथ्वीला पुनर्आकार देणारा अंतराळातील प्रचंड मोठा स्फोट 100 दशलक्ष वर्षे किंवा त्याआधी झाल्याचे पुरावे हाती लागले आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.