आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Martin Carplus, Micheal Levit, Eric Warshel Get Nobel In Chemistry

मार्टिन कारप्लस, मायकेल लेविट, एरिक वार्शेल यांना रासायनशास्त्रातील नोबेल जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - मार्टिन कारप्लस, मायकेल लेविट आणि एरिक वार्शेल यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.जगभरातील शास्त्रज्ञ गुंतागुंतीचे रासायनिक प्रयोग काही क्षणात संगणकावर करतात. याआधी प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी अनेक महिने लागत होते. तिघा शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामुळे ते शक्य झाले आहे.

पुरस्काराचे वितरण 10 डिसेंबर रोजी होणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने बुधवारी पुरस्काराची घोषणा केली. तिघांना प्रत्येकी 80 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.6 कोटी रुपये) पुरस्काराची रक्कम मिळेल. अकादमीच्या म्हणण्यानुसार, रासायनिक क्रिया प्रकाशाच्या गतीने होतात. शास्त्रज्ञ त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. मात्र, या तिघा शास्त्रज्ञांनी गुंतागुंतीच्या रासायनिक प्रयोगासाठी बहुस्तरीय मॉडेल विकसित केले. या माध्यमातून रासायनिक प्रयोग समजण्यास मदत मिळेल.


हे तीन विजेते
1. मार्टिन कारप्लस: वय 83 वर्षे. ऑ स्ट्रेलियामध्ये जन्म. सध्या अमेरिका व ऑ स्ट्रेलिया दोन्ही देशांचे नागरिक.
2. मायकेल लेविट : वय 66 वर्षे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जन्म. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलचे नागरिकत्व.
3. एरिए वार्शेल: वय 72 वर्षे. इस्रायलमध्ये जन्म. अमेरिका व इस्रायलचे नागरिकत्व.


रसायनशास्त्रात नोबेल
० आतापर्यंत 105 पुरस्कार प्रदान.
० 63 वेळा एका व्यक्तीस मिळाला.
०केवळ चार वेळेस महिलांना पुरस्कार.
० फ्रेडरिक सेंगर यांना दोन वेळेस(1958 व 1980 मध्ये)
० सर्वात कमी 35 व्या वर्षी फ्रेडरिक जोलियट यांना मिळाला.
० सर्वात जास्त 85 व्या वर्षी जॉन बी फॅन यांना.


भौतिकशास्त्राचे नोबेल वादाच्या भोव-यात
‘सर्न’ प्रयोगशाळेतही पुरस्कार हवा होता, ज्युरीचे मत

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार स्वित्झर्लंडमधील सर्न प्रयोगशाळेलाही द्यायला हवा होता, असे पुरस्कार निवड समितीच्या एका सदस्याने म्हटल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
हा निर्णय चुकला असे मला वाटते, असे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य अँडर्स बराने यांनी म्हटले आहे. मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बराने यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. या पुरस्काराच्या निवडीवरून बराचसा खल झाल्यामुळे या पुरस्काराची घोषणा तब्बल तासाभराने लांबणीवर पडली होती. ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचे विश्लेषण करणा-या पार्टिकलचा (देवकण) सिद्धांत मांडणा-या ब्रिटनच्या पीटर हिग्ज आणि बेल्जियमच्या फ्रँकोइस एंग्लर्ट यांना मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आला.


अनेकांचा अपेक्षाभंग
सर्न प्रयोगशाळेला भौतिकशास्त्राचे नोबेल मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, नोबेलच्या निर्णयाच्या घोषणेत या प्रयोगशाळेचा केवळ उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांचा अपेक्षाभंग झाला आहे. या प्रयोगात भारतीय शास्त्रज्ञांचाही हातभार होता.